Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana 2023 हेल्थ क्लेम किंवा आरोग्य संरक्षण आजही आपण घेण्याचे टाळतो. पण जर सरकार आपल्याला 5 लाखांच्या आरोग्य संरक्षणामध्ये सामावून घेणार असेल पण त्याबद्दल तरी जागरूक असायला पाहिजे.
![]() |
Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana 2023 |
Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana2023
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना आता एकत्रितपणे राबवल्या जात आहेत यापूर्वी योजना फक्त दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड धारकांनाच लागू होती. परंतु आता योजनेच्या विस्तारासाठी शासनाने योजना राज्यातील सर्वच रेशन कार्ड धारक आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट धारकांना लागू केले आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रतिक कुटुंब मिळणारा 5 लाख रुपये आरोग्य संरक्षणाचा लाभ आता सर्वांनाच घेता येणार आहे. योजनांमध्ये मिळणारा नेमका लाभ कोणता काय बदल करण्यात आले आहे हे तुम्हाला नक्की माहीत असले पाहिजे.
मित्रांनो 2 जुलै 2012 पासून महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यास सुरुवात झाली. आणि 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी या दोनही योजना एकत्रितपणे महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.
योजनेच्या नावाचा शॉर्टफॉर्म मध्ये अश्या नावाने ओळखल्या जातात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे PMAJAY व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे MJPJAY यापूर्वी MJPJAY मध्ये दरवर्षी प्रती कुटुंब फक्त 1 लाख 50 हजार रुपयाचे आरोग्य संरक्षण मिळत होते. तेही फक्त दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डधारकांना कुटुंबांना म्हणजेच जर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये रुग्णांनी उपचार घेतले तर लागणारा खर्च MJPJAY योजनेतून दिला जात असे.
यासाठी रुग्णाला फक्त रेशन कार्ड सादर करावे लागायचे आता PMAJAY योजना आपल्याला सर्वांना माहिती आहेच त्यांना प्रत्येक वर्षी प्रति कुटुंब 5 लाखांचे आरोग्य संरक्षण दिले जाते. पण आता या दोन्ही योजना एकत्र केल्याने MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा 5 लाखांचे आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्षी मिळणार आहे. सर्व रेशन कार्ड आणि डोमिसाईल प्रमाणपत्र धारकांना आता नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कुटुंबातील एक किंवा अधिक व्यक्तींच्या उपचारासाठी लागणारा 5 लाखांपर्यंतचा खर्च या योजनेमधून भागवला जाणार आहे.
Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana या योजनेमध्ये झालेला दुसरा मोठा बदल म्हणजे किडनी सर्जरी शस्त्रक्रियेसाठी याआधी उपचार खर्चाची मर्यादा दोन लाख पन्नास हजाराची होती. ती आता 4,50,000 हजार इतकी करण्यात आलेली आहे.
Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule
मित्रांनो नुसते लिमिट नाही तर या दोन्ही योजनांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. ज्यामुळे आता 1,356 उपचार या योजनांमध्ये केले जातील. आणि हे उपचार दोन्ही एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत रुग्णालय म्हणजे 1350 नेटवर्क हॉस्पिटल मध्ये करता येणार आहेत.
28 जुलै 23 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे. आता ही झाली आजार व त्यावरील उपचारांची माहिती.
मित्रांनो राज्यातील नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुद्धा आता MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये 184 उपचार केले जाणार असून प्रत्येक रुग्ण खर्चाची मर्यादा 30 हजारांची होती ती आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आले आहे.
आतापर्यंतच्या माहितीनुसार तुम्हाला लाभ समजले आता हे लाभ मिळणार कोणाला ते समजून घेऊया ?
'Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana' योजनांसाठी लाभार्थी कोण आहेत?
सेंट्रल गव्हर्नमेंटने काही ठराविक कुटुंबांना योजनेमध्ये सहभागी केले होते आता राज्य शासनाने ज्या सर्व कुटुंबांना समाविष्ट केले आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यादीमध्ये असणार आहेत.
त्यासाठी आधी नागरीक PMAJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थी आहेत का ते तपासले जाईल. नसेल तर त्यांना MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल.
सध्या PMAJAY योजनेत जनगणणेत समाविष्ट कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब आणि ज्या कुटुंबांची शिफारस राज्य शासनाने केली आहे त्या कुटुंबांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
राज्य शासनाने MJPJAY योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड अन्नपूर्णा योजना आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबांचा गट-अ मध्ये समावेश केलेला आहे.
तुमचे नाव घरकुल योजनेत आहे का चेक करा
गट-ब मध्ये पांढरे रेशन कार्ड धारक सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंबांचा समावेश आहे. तसेच याच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नाही असे सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंबाचाही समावेश केलेला आहे.
गट-क मध्ये शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय किंवा शासन मान्य अनाथ आश्रमातील मुले, शासकीय किंवा शासन मान्य महिला आश्रमातील महिला शासकीय किंवा शासन मान्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे निकषानुसार पत्रकार अवलंबून असलेले कुटुंबीय सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळे, नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्य बाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.
Ayushaman Bharat Yojana
या सर्वांना आता दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये आरोग्य संरक्षण मिळणार आहे.
गट-ड सुद्धा दिलेला आहे तो असे रुग्ण ज्यांचा महाराष्ट्राच्या सीमा भागात अपघात झाला असेल मग जखमी रुग्ण देशाबाहेरील असेल आणि ते गट अ ब आणि क मध्ये समाविष्ट नाही त्यांचा गट ड मध्ये समावेश केलेला आहे. गट ड च्या रुग्णांसाठी आरोग्य संरक्षण फक्त एक लाख रुपये प्रति रुग्ण असेल.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे
1) ज्या लाभार्थ्यांचा समावेश "Ayushaman Bharat Yojana! Mahatma Jotiba Phule Jan Aarogya Yojana" आरोग्य योजनेमध्ये होतो त्या लाभार्थ्यांना ई कार्ड दिले जातात.
मित्रांनो ई कार्ड म्हणजे आयुष्मान भारत कार्ड आधार कार्ड असे म्हणून ओळखतो.
या लाभार्थ्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते.
2) जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत लाभार्थी असतील त्यांना रेशन कार्ड आणि फोटो असलेले ओळखपत्र पॅन कार्ड वोटर आयडी इत्यादी सादर करावा लागेल.
3) गट ब लाभर्थ्यांना पांढरे रेशन कार्ड नसेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट किंमत तहसीलदार दाखला पत्र सादर करावे लागेल.
4) या गटातील सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन सादर करावे.
5) गट ड च्या लाभर्थ्यांना दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र सादर करावे लागेल अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयांना रवीला फोटो मतदार कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक सादर करावे लागेल.
येथे क्लिक करून तुमचा CreateAabha यावर क्लिक करून आधार नंबर टाकून 2 मिनिटात आभा कार्ड बनवा
या योजनेविषयी माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आमचे काही चुकले असल्यास comment मध्ये अवगत करा सूचना करा
धन्यवाद....
0 Comments
ही कोणतीही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा शासनाशी संबंधीत नाही. कृपया ह्या वेबसाईटला Official website समजू नये. आणि कॉमेंट्स मध्ये आपला आधार क्रमांक किंवा संपर्क क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती सोडू नये. आम्ही कोणत्याही योजनेच्या किंवा बातमीच्या तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातमी, योजना किंवा या website वर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website ला किंवा संबंधित अधिकारी यांना भेट देण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद ...