ग्रामीण भागात करता येणारे 10 व्यवसाय ! Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay

  

Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay 

Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay
 Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay


1) कुकुटपालन              

                           कुक्कुटपालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून  उपजीविकेचे साधन आहे.  यामध्ये मांसासोबतसोबत अंड्याचे उत्पादन होते.  सध्या शहरी अथवा ग्रामीण भागामध्ये गावरान कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा फार कमी आहे ग्रामीण भागातील तरुणांनी अथवा नागरिकांनी अर्ध बंदिस्त पद्धतीने कुकुटपालन व्यवसाय केल्यास आपल्या शेतीलाही  हातभार लागेल व युवकांना रोजगाराची ही संधी उपलब्ध  होऊ शकते.                                      

तुमचे नाव घरकुल योजनेत आहे का चेक करा

2) शेळी पालन  

                           शेळीला गरीबाची घाई म्हणून संबोधले जाते.  शेळीपालन हा शेती पूरक व्यवसाय म्हणून  केला जातो.  गाई,  म्हैस इत्यादी जनावरांच्या प्रमाणात  शेळीला खाद्य कमी प्रमाणात लागते.  हा व्यवसाय  कमी भांडवल  आणि कमी जागेत करता येण्यासारखा आहे.   शेळी काय पालन हा व्यवसाय  बंदिस्त  तसेच अर्ध बंदिस्त या दोन्ही   पद्धतीने केला जाऊ शकतो.  शेळ्यांचे आरोग्य,  पाणी  आणि चाऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास  हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay  ग्रामीण भागातील  बेरोजगार   युवक  या व्यवसायात आल्यास रोजगारी वर मात करता येऊ शकते. 

      Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay                                     

3) दुग्धव्यवसाय 

                                 दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायांमध्ये  फार पूर्वीपासूनच चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे.  दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई , देशी गाई,  गावठी दुधाळ गाई आणि म्हैशी यांचे पालपालन केले जाते.  आहार दृष्ट्या प्रत्येक व्यक्तीला दररोज साधारण 300ml दुधाची आवश्यकता असते परंतु मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होत नसल्याने आपण नेहमीच बातम्यांमध्ये पाहत असतो भेसळ युक्त दुधाचा पुरवठा विषयीच्या अनेक बातम्या नेहमीच येत असतात  म्हणून ग्रामीण भागातील तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यास शुद्ध  भेसळ विरहित दुधाचा उत्पादन घेऊन त्याचा शहरी भागामध्ये पुरवठा करता येऊ शकतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात  आर्थिक फायदा  मिळवता येईल.          

      ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

4)  मशरूम शेती

                   मशरूम   ज्याला आपण स्थानिक बोलीभाषेमध्ये अळिंब   म्हणून ओळखतो  शेती हा व्यवसाय देखील अगदी कमी जागेत व कमी पाण्यात   करता येण्यासारखा शेतीपूरक व्यवसाय आहे.  मशरूम शेती करण्यासाठी बंदिस्त जागेची आवश्यकता असते,  त्यासाठी झोपडी, बांबू हाऊस,  मातीचे घर यामध्ये   मशरूमचे उत्पन्न उत्तम रित्या घेता येते.  मशरूम हे बुरशी वर्गातील पीक आहे म्हणून  मशरूमचे  उत्पादन घेण्यासाठी  1) गव्हाचा भुसा 2) भाताचा पेंडा 3) गवत 4) सोयाबीनचा भुसा 5) कडबा 6) कपाशीच्या काड्या इत्यादी कच्चा मालाची म्हणजेच शेतीपासून टाकाऊ असलेल्या गोष्टीचा  वर केला जातो,  व  त्यावर विशिष्ट पद्धतीने  पिशव्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या ट्रे  वरील उल्लेख केलेल्या भुसाचा  वापर करून त्यामध्ये अळिंबाचे बी मध्ये पेरून मशरूम म्हणजेच अळिंब चे उत्पादन घेतले जाते.

                                                                              

5 )  रेशीम शेती

                          शेतकरी मित्रांनो कडे ज्याप्रमाणे   आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय , कुक्कुटपालन,  शेळीपालन किंवा यासारखे  अनेक शेतीपूरक व्यवसाय केले जातात.  त्याचप्रमाणे रेशीम शेती हा देखील एक कमी खर्चामध्ये करता येण्यासारखा शेतीपूरक व्यवसाय आहे.  तुती या झाडांची नवीन  लागवड पद्धत व संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय अत्यंत कमी मजुरांकडून करता येतो किंवा घरातील लहान थोर  माणसांच्या करवी हा व्यवसाय करून महिन्या काठाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येतो. रेशीम शेती चालना मिळाली म्हणून शासनाने रेशीम  खरेदीचे दर ही निश्चित केलेले आहेत.  म्हणून रेशीम निर्मिती किंवा रेशीम शेती  करून 'Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay'  ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करता येऊ शकते. 

Gramin Bhagat Karata Yenar Vevsay 

6) मधमाशी पालन 

                            नैसर्गिक पद्धतीने मधाचे उत्पन्न अत्यंत कमी व बाजारातील मोठ्या प्रमाणात असणारी मागणी पाहता मधाचे जास्त प्रमाणात प्राप्तीसाठी व त्याची विक्री करण्यासाठी मधमाश्या पाळल्या जातात.यामध्ये शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर तसेच शेतात असलेल्या झाडवरसुद्धा पेट्या ठेवतात, अश्या पद्धतीने शेतकर्‍यांनी मधमाशी पालन केल्यास मधाचे तर उत्पन्न मिळतेच शिवाय व शेतात असणार्‍या पिकाचे योग्यरित्या परागिभवन प्रक्रिया झाल्यामुळे त्याचाही उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केल्यास. हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उधोग आहे . त्यापासून निघणारे नैसर्गिक मेणही आर्थिक लाभदायक असते.


7) मत्स्य पालन

                     आजच्या काळात माशांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने कृत्रिम जलाशय बनवले जात आहेत. ज्या ठिकाणी नदी आणि तलावात कोणते मासे येतात त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. मासळीची वाढती मागणी पाहता सध्याच्या काळात मत्स्यपालन व्यवसाय सुरू करून खूप चांगला नफा मिळवता येतो.


तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून नफा मिळवायचा आहे, तर तुम्ही मत्स्यपालन व्यवसायाकडे पाहू शकता. मत्स्यपालन म्हणजेच मासेमारी व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्यवसाय बनू शकतो.

मत्स्यपालन व्यवसायात टाकी किंवा तलाव बांधले जातात. ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे जसे: रोहू, सिल्व्हर, ग्रास, भाकूर आणि नानौ जातीचे मासे पाळले जातात. बाजारात विकून चांगला नफा मिळतो.

सोप्या भाषेत सांगायचे तर मासे वाढवून बाजारात विकून नफा मिळवणे याला मत्स्यपालन किंवा मत्स्यपालन व्यवसाय म्हणतात. .

                 

8) चारा निर्मिती 

                         बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे हि समस्या ठरू लागली आहे. तसेच शेतकर्‍यांचा दुग्धव्यवसायकडे वाढता कल पाहता मोठ्या प्रमाणात वर्षभर चारा ची मागणी वाढत आहे. चाराची ही गरज भरून काढण्यासाठी व दर्जेदार उत्तम प्रतीचा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील तरुणांनी ह्या व्यवसायात आल्यास मोठ्या प्रमानात रोजगार निर्मिती होऊ शेकते.                                                   मोदी आवास घरकुल योजना 2023

                 1) पारंपरिक चारा निर्मिती :-
                                                        शेती पूरक व्यवसाय मध्ये चारा उत्पादन निर्मिती हा एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. यामध्ये कोरडा चारा साठवून ठेवणे यामधे ज्वारीचा कडबा कुटी करून १०० किलो बॅग भरून विक्री करू शकता.सोयाबीन,ज्वारी,हरबरा,तुर,गहू, मूग,यांचे गुळी,(भूसा) एकत्रित किंवा स्वतंत्र पणे विकू शकतो. विविध प्रकारचे नेपियर घास, कडोळ,मका,लागवड करून हिरवी कापून जनावराच्या बाजारात,किंवा गावात पण सरी प्रमाणे विक्री करता येईल. शेळी साठी लागणारे विविध प्रकारचे चारे लागवड करून शहराच्या ठिकाणी प्रतेक शहरात अशी काही ठिकाणे असतात त्या ठिकाणी शेळीचा ओला,सुका,चारा दररोज विकला जातो. 

                 2) मुरघास :- 
                              मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत आंबवून करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.


                  3)हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाना:- 
                                                     हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारापिके ( मका,गहू,बाजरी, इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट) पाणी देण्याची यंत्रणा(मिनी स्पिंकलर किंवा ऑगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात (२५ ते ३० से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यास खर्च अत्यल्प होऊ शकतो.


      ह्या तसेच ह्याच पद्धतीने अजून वेगवेगळ्या पद्धतीने चारा पीक उत्पादन करून त्याला व्यावसायिक द्रुस्टीने पाहील्यास ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते.

                                                                   ऑनलाइन रेशन कार्ड काढा 2023

9) गांडूळ खत 


                      गांडूळ हा जमिनीत राहणारा जीव आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा ते वीस  टक्के भाग ठेवतो व बाकीचा एंशी ते नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. सर्व द्रुस्तिने गांडूळखत हे शेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे गांडूळ ला शेतकर्‍याचा मित्र म्हटले जाते,गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.

Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay 

10) कृषी पर्यटन उद्योग 

                            शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जवळपास 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या शेतीवर अवलंबून आहे. तसेच भारताच्या GDP मध्ये शेती क्षेत्राचा वाटा जवळपास 25 टक्के आहे. जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्र हे दर वर्षी 4 टक्क्याने वाढत आहेत, तर भारतीय पर्यटन क्षेत्र दर वर्षी 10.1 टक्के या दराने वाढत आहे, त्यामुळे कृषी पर्यटन ही भारतीय शेतकर्‍यांसाठी खुप मोठी संधी आहे. विशेषता: महाराष्ट्रामध्ये याचा प्रसार मोठ्या वेगाने होत आहे. पर्यटनामुळे रोजगार निर्मिती होते, गरीबी कमी होण्यास मदत होते तसेच शाश्वत मानव विकासाला सुद्धा चालना मिळते. 

                               सध्या खुप शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न कमवत आहेत. एकेकाळी शेती पर्यटन हे खुपच छोटे क्षेत्र होते जे आता वेगाने वाढत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात कृषी पर्यटनाला सर्व जगभरातुन प्रतिसाद भेटत आहे शिवाय पर्यटन मंत्रालय देखील या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे.

                                मागील 2-3 वर्षात बरेच कृषी पर्यटन केंद्र (agro tourism center's) शहरांच्या आसपास तयार झाले आहेत. शहरामधील खुप सार्‍या शाळा अश्या ठिकाणी मुलांच्या सहलीचे आयोजन करत आहेत ज्यामधुन मुलांना ग्रामीण सस्कृती तसेच ग्रामीण जीवनविषयी माहिती मिळते. गाय, म्हैस, बैल, वासर, शेळ्या, कोंबड्या इ. पशु, पक्षी यांच्या सोबत वेळ घालवता येतो."Gramin Bhagat Karata Yenare 10 Vevsay" भारत सरकार तसेच महाराष्ट्र शाशनाने देखील या क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची क्षमता ओळखली आहे म्हणूनच सरकारने आपल्या पर्यटन धोरणात (agri tourism policy in india) कृषी पर्यटनाला महत्व दिलेले आहे.

                                   वरील सर्व शेतीपूरक व्यवसाय साठी राज्याच्या तसेच केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या शेतकर्‍यांना तसेच तरुणांना हयापैकी शेतीपूरक व्यवसाय करायचे असल्यास ते लाभ घेऊ शकतात. 

ग्राम पंचायत निवडणूक 2023

                               आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. 

                                                                                                                 धन्यवाद.....




Post a Comment

0 Comments