PM Vishwakarma Yojana ची विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.
![]() |
PM Vishwakarma Yojana |
योजनेचा उद्देश :
पारंपारिक प्रकारच्या कारागिरांना त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन तसेच चालना मिळावी म्हणून बँकेत कोणत्याही प्रकारची गॅरंटी न घेता 3 लाखापर्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे.
PM Vishwakarma Yojana
कोणतेही पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिराला या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी दिले जाते. त्यानंतर पहिले 1 लाखाची बिनव्याजी घेतलेले कर्जाची परत फेडीनंतर व्यवसायात वाढ करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
त्यासाठी पहिल्यांदा पाच दिवसाचा प्रशिक्षण पूर्ण करावा लागेल त्यानंतर त्या 15,000 पर्यंतचे साहित्य किंवा तेवढी रक्कम दिली जाईल. प्रशिक्षण कालावधी मध्ये दररोज 500 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
प्रशिक्षणार्थी 'PM Vishwakarma Yojana ' च्या उत्पादनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र व जाहिरातीतून मार्केट उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत मदत केली जाणार आहे.
PM Vishwakarma
खालील कारागीर योजनेचे लाभार्थी असतील PM Vishwakarma Yojana
- सुतार
- होडी बनवणारे
- लोहार
- घिसाडी
- टोपली
- चटई
- झाडू बनवणारे
- काथ्या विणकर
- बाहुल्या व खेळणी बनवणारे पारंपारिक कारागीर
- सोनार
- कुंभार
- चांभार
- हातोडा व टूलकिट बनवणारे
- कुलूप किल्ली बनवणारे
- मूर्तिकार
- पाथरवट
- दगड फोडी
- गवंडी
- न्हावी
- फुलांचे हार बनवणारी
- धोबी
- शिंपी
- पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर
योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यवसाय यापैकी एकाशी संबंधित असणे आवश्यक.
- वय 18 ते 50 असावा.
- मान्यताप्राप्त संस्थेचे ट्रेडिंग प्रमाणपत्र असावे.
- योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या कोणत्याही जातीचा असावा.
आवश्यक कागदपत्रे
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
PM Vishwakarma Yojana
असा करा अर्ज
- अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा
- Apply Online लिंक वर क्लिक करा
- पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा
- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मोबाईलवर एसएमएस द्वारे प्राप्त होईल
- नोंदणी फॉर्म वाचून तो पूर्णपणे अचूक भरा मराठी
- भरलेल्या पॉर्न सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करा
योजनेची ठळक बाबी
- स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार.
- योजनेतील लाभार्थ्यांना पाच दिवसाचा प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल.
- प्रशिक्षणार्थी लाभार्थी यांना प्रशिक्षण कालावधी मध्ये दररोज ₹500 याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार.
- प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रमाणपत्र जोडून बँकेकडे बिनव्याजी एक लाख रुपये कर्ज साठी अर्ज करणे.
- बिनव्याजी कर्जाची परतफेड केल्यानंतर पुढील दोन लाखाच्या कर्जासाठी अर्ज करणे.
जर तुम्हाला "PM Vishwakarma Yojana" हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद...
0 Comments
ही कोणतीही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा शासनाशी संबंधीत नाही. कृपया ह्या वेबसाईटला Official website समजू नये. आणि कॉमेंट्स मध्ये आपला आधार क्रमांक किंवा संपर्क क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती सोडू नये. आम्ही कोणत्याही योजनेच्या किंवा बातमीच्या तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातमी, योजना किंवा या website वर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website ला किंवा संबंधित अधिकारी यांना भेट देण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद ...